Bhulekh Mahabhumi 7/12, 8A (Digital Satbara)
महाराष्ट्र शासनाने आत्ता आपल्या नागरीकांसाठी जमिनी बद्दल असणाऱ्या दस्तावेजाची माहिती ही online केलेली आहे. त्यामुळे आपल्याला तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज नाही.
Service Available on mahabhulekh bhumi
- विना स्वाक्षरी ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक (Property Card) आणि क-प्रत
- आपली चावडी नोटीस (Aaapli Chawdi), Bhunaksha
- जुने ७/१२ व फेरफार (e-Ferfar, Aaple abhilekh)
- डिजिटल ७/१२ (Digitally signed 7/12)
- डिजिटल ८ अ (Digitally signed 8 A)
जर तुम्हाला विना स्वाक्षरी तील ७/१२ काढायचा असेल तर BhulekhMahabhumi या अधिकृत website ला भेट दया. मग खालीलप्रमाणे दिलेल्या मार्गदर्शनाने पद्धतीचा अवलंब करा. आपला जिल्हा, तालुका, गाव निवडून आपला सर्वे नंबर टाकून निवडून घ्या त्यानंतर मोबाईल नंबर टाकून Capcha कोड टाकून Submit करा.

विना स्वाक्षरीतील ७/१२ उतारा (mahabhumi abhilekh) खालील प्रमाणे असेल तसेच हा ७/१२ उतारा शासनाच्या कुठल्याही कामासाठी चालणार नाही याचा उपयोग फक्त बघण्यासाठी होईल. शासनाने नागरीकांना आपल्या मालमत्ते विषयी माहिती जाणून घेण्यासाठी तहसील किंवा सजा कार्यालयात जाण्याची गरज पडू नये म्हणून ही योजना सुरु केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक विभाग आणि जिल्हे
अमरावती (Amravati) | अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशीम |
छत्रपती संभाजीनगर (Chattrapati Sambhajinagar) | औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर |
कोकण (Kokan) | मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
नागपूर (Nagpur) | नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली |
नाशिक (Nashik) | नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार |
पुणे (Pune) | पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर |