महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेला 8A, 7/12, मालमत्ता पत्रक साठी एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. त्यालाच आपण Digital Satbara पोर्टल देखील म्हणतो.
डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, मालमत्ता पत्रक Download किंवा बघण्यासाठी Mahabhulekhbhumi साईट ला भेट द्या.
Digital Satbara मिळवण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतींचा अवलंब करा.
Digital Satbara काढण्यासाठी digitalsatbara.mahabhumi.gov.in पोर्टल ला भेट द्या.
तुम्ही जर नवीन user असाल तर New User Registration वर क्लिक करून Registration करून घ्या कदाचित तुम्ही आधीच Registration केले असेल तर Login वर क्लिक करा.

सर्वप्रथम तुम्हाला जर Account मध्ये balance नसेल तर करून घ्या आणि जर शिल्लक असल्यास पुढे जा.
खाली दिल्या-प्रमाणे Recharge Account Tab वर क्लिक करा नंतर आवश्यक तेवढी रक्कम टाका आणि Confirm करा .

आम्ही येथे UPI ने Payment करण्यासाठी निवडले आहे. UPI Id टाकून Pay करा.

त्यानंतर तुम्हाला ज्या दस्तावेजाची गरज आहे त्या Digitally signed 7/12 वर क्लिक करा.
मग तुम्हाला पाहिजे असलेला District, Taluka, Villlege निवडा त्यानंतर अंकित सातबारा हा पर्याय निवडून तुमच्या गरजेचा 7/12 क्रमांक टाकून निवडून घ्या आणि मग Download करा.

तुम्ही Download केलेला Digital 7/12 खालीलप्रमाणे दिसेल. आत्ता तुम्ही याचा उपयोग शासनाच्या कुठल्याही कामाकरीता करू शकता.
